जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर!
मुलुंड पूर्वेकडील गव्हाण पाडा, फायर ब्रिगेड परिसरातील रहिवाशांनी त्यांच्या विविध स्थानिक समस्यांसंदर्भात माझ्याशी संपर्क साधला. त्यानंतर मी त्वरित घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
सदर ठिकाणी महावितरणचा भोंगळ व हलगर्जी कारभारामुळे स्थानिक रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत होता.
तसेच, फायर ब्रिगेडजवळील परिसरात अनधिकृत शाळेच्या बसेस रस्त्यावर उभ्या केल्या जात आहेत, ज्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या ठिकाणी वाहतूक कोंडी होण्यासोबतच चैन स्नॅचिंगसारख्या गुन्ह्यांची शक्यताही वाढली आहे, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
मी संबंधित महावितरण अधिकारी व वाहतूक विभागाचे अधिकारी यांना तातडीने घटनास्थळी बोलावून सर्व समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. रहिवाशांच्या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेता, लवकरात लवकर योग्य तोडगा काढण्याचे स्पष्ट निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. या प्रसंगी महानगरपालिका अधिकारी उपस्थित होते.