“मुलुंडमधील ३५ हजार जेष्ठ नागरिकांपर्यंत प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे!
आजच्या शिबिरात ६०४ नागरिकांची यशस्वी नोंदणी करण्यात आली.
मुलुंड पश्चिममधील माझ्या कार्यालयात १५ जानेवारीपर्यंत नोंदणी सुरू राहील.
उद्या मुलुंड पूर्वमध्ये हरिओमनगर मध्ये नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येईल.
आमचा उद्देश जेष्ठ नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळवून देण्याचा आहे. मुलुंडकरांनी मिळवलेल्या या संधीचा लाभ घ्यावा, हीच विनंती. दररोजच्या शिबिरांची माहिती आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.