अंतिम फेरीत महिलांच्या उत्साहाला भरभरून प्रतिसाद मिळाला


भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित मंगळागौर स्पर्धेला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. काल मुलुंड पूर्व येथे झालेल्या अंतिम फेरीत महिलांच्या उत्साहाला भरभरून प्रतिसाद मिळाला. विजेत्यांमध्ये प्रथम क्रमांक: नवदुर्गा ग्रुप ३ लाख ५१ हजार रुपये, द्वितीय क्रमांक: कलादर्पण ग्रुप २ लाख ११ हजार रुपये तर तृतीय क्रमांक: साज ह्यो तुझा १ लाख रुपयांचे बक्षिस देण्यात आले. प्रत्येकी ६ ग्रुपना १५ हजार प्रोत्साहन पारितोषिक देण्यात आलं. कला, संस्कृती आणि परंपरेच्या जतनासाठी असे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असतात. दैनंदिन धावपळीतून उसंत घेण्याची संधी मिळाल्याचं मनोगत महिला भगिणींनी व्यक्त केले. या स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. नवरात्रीच्या मंगलमयी शुभेच्छा दिल्या!

Please follow and like us:
107 views
Posted on October 5, 2024

You may also like

Page 38 of 54