ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचे मनःपुर्वक आभार


ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचे मनःपुर्वक आभार. आपण माझ्यावर मतांच्या रुपात प्रेम आणि विश्वास दाखवला. याबद्दल मी नेहमी आपल्या ऋणात राहिल.
काहीश्या फरकाने विजय हातून निसटला, हा पराभवही माझा लोकसेवेवरचा विश्वास अधिक वाढवणाराच आहे. तुमच्या प्रत्येक संघर्षात,अडचणीत आणि आनंदात मी सोबत आहे.
या बरोबरच ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यांनी मा. नरेंद्र मोदीजी साहेब आणि मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आभार मानतो.
पराभवाने खचू नये विजयाचा उन्माद करु नये, ही शिकवण आम्हाला प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे. येत्या शनिवारपासून मी पुन्हा जनसेवेत रुजु होतो आहे.
शनिवारी सकाळी ११ वाजता मुलुंडमध्ये ‘जनता दरबार’ भरवत आहे. ईशान्य मुंबईतील इतर भागातील जनता दरबार नियोजनाची माहिती आपणास लवकरच देण्यात येईल.
आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं यासाठी उपस्थित रहावं, हीच विनंती.
कळावे,
आपला सेवक
मिहिर कोटेचा
Please follow and like us:
0 views
Posted on June 5, 2024

You may also like

Page 3 of 44