घाटकोपर पूर्वेला विठ्ठल – रखुमाईचा आशिर्वाद आणि छत्रपती शिवाजी महाराजांना नमन!


विठ्ठल – रखुमाईचा आशिर्वाद आणि छत्रपती शिवाजी महाराजांना नमन! आजचा झंझावाती प्रचार दौरा घाटकोपर पूर्वेला लक्ष्मीनगर रसिका हॉटेलपासून सुरू झाला तर पुढे रामेश्वर मंदिर, म्हाडा कॉलनी, लक्ष्मीबाग आणि विठ्ठल – रखुमाई मंदिर इथे समाप्त झाला. या प्रचारफेरी दरम्यान माझ्यादृष्टीने भाग्याचे असे दोन योग आले. प्रचारफेरीत एकेठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मला नमन करता आलं तर विठ्ठल – रखुमाई या महाराष्ट्राच्या दोन दैवतांच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घेता आलं. त्यांचे आशिर्वाद घेतल्याने मला देखील स्फूर्ती मिळाली. या प्रचारफेरीला खासदार मनोज कोटकजी आणि आमदार पराग शहाजी उपस्थित होते. प्रचारफेरीमध्ये अबालवृद्धांसह, तरूणांची, महिलांची भेट झाली आणि थेट त्यांच्याशी चर्चा केली. लोक देखील मला भेटण्यासाठी पुढे येऊन त्यांची मतं, अनुभव सांगत होते. कुठे महिलांनी मला ओवळालं तर कुठे माझा त्यांनी पुष्पगुच्छासह सत्कार केला. या सगळ्यांनी माझ्या प्रचारफेरीला पाठिंबा दर्शवला याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. Today my rally started from Ghatkopar East’s Laxminagar Rasika Hotel, Rameshwar Mandir, Mhada Colony, Laxmibaug & ended at Vitthal – Rakhumaai Mandir. During this rally, I bowed down in front of Chhatrapati Shivaji Maharaj & took darshan & blessings from Vitthal – Rakhumaiji’s mandir. They both are motherly gods of the state of Maharashtra. I received positive energy from them. During this rally, MP Manoj Kotak ji & MLA Parag Shah ji were present. Many people like youth, men & women met me & assured their valuable support to us. I thank them all.

Please follow and like us:
2 views
Posted on April 12, 2024

You may also like

Page 3 of 44