जेष्ठ नागरिकांची काळजी घेणे, त्यांना सन्मानाचे जगणे देणे हे आपले कर्तव्य आहे. विक्रोळी विधानसभा येथे अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ आणि मंथन शैक्षणिक संस्थेतर्फे छत्री वाटप सोहळ्यात उपस्थित होतो. ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसला. या कार्यक्रमात श्री. सुहास माटे, श्री. विनोद दामोदर घोगळे (विक्रोळी विधानसभा अध्यक्ष – म्हाडा सेल), आणि श्रीमती श्रुती विनोद घोगळे (विक्रोळी विधानसभा – महिला मोर्चा महामंत्री) यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना सन्मान देण्यात आला. एकत्र येऊन समाजाच्या सेवेसाठी सतत प्रयत्नशील राहूया.”