ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीनुसार त्वरित कृती
मुलुंड पश्चिम येथील लाला तुलसिराम देवीदयाल उद्यान येथे महानगरपालिकेमार्फत व्यायामाचे साहित्य लावण्याचे काम सुरू होते. मात्र, तेथील ज्येष्ठ नागरिकांकडून तक्रार प्राप्त झाली की हे साहित्य मोठ्या प्रमाणात जागा व्यापत असून, त्यामुळे बागेतील हिरवळ आणि मोकळेपणा कमी होत आहे.
नागरिकांच्या या तक्रारीची गंभीर दखल घेत, पालिका अधिकाऱ्यांसोबत तात्काळ उद्यानाला भेट दिली व पाहणी करून योग्य तो निर्णय घेतला तसेच सोबत जिल्ह्याचे अध्यक्ष दिपक दळवी जी उपस्थित होते.
सर्वांच्या हिताचा विचार करून, त्या ठिकाणी व्यायाम साहित्य न लावण्याचे स्पष्ट निर्देश महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिले.
 नागरिकांच्या सूचनांना प्राधान्य
 नागरिकांच्या सूचनांना प्राधान्य हरित व मोकळ्या जागांचे जतन
 हरित व मोकळ्या जागांचे जतन ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान
 ज्येष्ठ नागरिकांचा सन्मानआपल्या सहकार्यानेच आपण सुंदर, सुसज्ज आणि सर्वसमावेशक मुलुंड घडवू!




 
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
    