 “तिरंगा यात्रा” – एकतेचा आणि अभिमानाचा संगम
 “तिरंगा यात्रा” – एकतेचा आणि अभिमानाचा संगम 
दिनांक 17 मे 2025 रोजी, ऑपरेशन सिंदूर या यशस्वी कारवाईला मानवंदना देण्यासाठी आयोजित केलेली “तिरंगा यात्रा” मोठ्या उत्साहात पार पडली.
 छत्रपती संभाजी राजे मैदान ते हनुमान चौक पर्यंतचा संपूर्ण मार्ग देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमला.
 छत्रपती संभाजी राजे मैदान ते हनुमान चौक पर्यंतचा संपूर्ण मार्ग देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमला. गहाणपाडा, मुलुंड स्टेशन (पूर्व), एन. व्याय. सिनेमा, सुयोग सोसायटी या प्रमुख ठिकाणी थांबे घेत जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यात्रा पुढे सरकली.
 गहाणपाडा, मुलुंड स्टेशन (पूर्व), एन. व्याय. सिनेमा, सुयोग सोसायटी या प्रमुख ठिकाणी थांबे घेत जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यात्रा पुढे सरकली.या यात्रेने संपूर्ण परिसरात एक सकारात्मक उर्जा निर्माण केली. प्रत्येक तिरंगा हाता-हातात घेऊन चालणारा नागरिक जणू काही स्वतः देशासाठी रक्षणाच्या रणभूमीत उतरल्याचा आत्मविश्वास दाखवत होता. शिस्त, सजगता, आणि देशभक्ती – या तिन्ही मूल्यांनी यात्रा भारलेली होती.
ही यात्रा म्हणजे आपल्या वीर जवानांच्या पराक्रमाला आणि बलिदानाला मानाचा मुजरा आहे.
यात्रेत महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, समाजसेवक यांचा सहभाग लक्षणीय होता. संपूर्ण मार्गात भारत मातेच्या जयघोषाने परिसर देशभक्तीत रंगून गेला होता.




 
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
    