तिरंगा यात्रा’ – राष्ट्राभिमान आणि शौर्याचा भव्य सोहळा!
देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या प्रेरणेतून, ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर देशभरात जनजागृतीसाठी ‘तिरंगा यात्रा’ चे आयोजन करण्यात आले.
आज घाटकोपर पश्चिम येथे उत्तर-पूर्व मुंबईच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले. अमृत नगर सर्कल ते घाटकोपर स्टेशनपर्यंत ही देशप्रेमाने ओतप्रोत भरलेली यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. या यात्रेत उत्साहाने सहभाग घेत उपस्थित राहिलो. देशभक्तीचा तो क्षण खरोखरच प्रेरणादायी होता. या यात्रेने संपूर्ण परिसरात एक सकारात्मक उर्जा निर्माण केली. प्रत्येक तिरंगा हाता-हातात घेऊन चालणारा नागरिक जणू काही स्वतः देशासाठी रक्षणाच्या रणभूमीत उतरल्याचा आत्मविश्वास दाखवत होता. शिस्त, सजगता, आणि देशभक्ती – या तिन्ही मूल्यांनी यात्रा भारलेली होती.




 
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
    