देशाच्या उभारणीसाठी प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलायचा आहे, हेच या दिवसाचं सत्य आहे


मुलुंड पोलिस स्टेशनमध्ये ध्वजारोहण सोहळ्यात सहभागी होत तिरंग्याला मानवंदना दिली. स्वातंत्र्यदिनाच्या या पवित्र क्षणी ऊर्जा भरलेला उत्साह आणि चिमुरड्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मला उर्जित करत होता. पंधरा ऑगस्टच्या शाळेतील आठवणींनी मन पुन्हा त्या दिवसांमध्ये हरवले. हा दिवस केवळ आनंदाचा नसून, बलिदान देणाऱ्या क्रांतीवीरांना स्मरण करण्याचा आहे. देशाच्या उभारणीसाठी प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलायचा आहे, हेच या दिवसाचं सत्य आहे. जय हिंद!

Please follow and like us:
0 views
Posted on August 15, 2024

You may also like

Page 7 of 44