मुलुंड पश्चिम – टीकवूड, रेडवुड, पाइनवूड, सिल्वर बर्च, सिल्वर ओक, गोल्डन विलो, विलो टॉवर आणि योगी हिल या सोसायट्यांमधील नागरिकांनी कमी पाणी दाबामुळे उद्भवणाऱ्या अडचणींबाबत तक्रार नोंदवली.
या समस्येची तात्काळ दखल घेत टी विभाग जलपुरवठा अधिकाऱ्यांना बोलावून आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
तसेच परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी बुधवारी आढावा बैठक होणार आहे.