प्रभू श्रीरामांना स्मरून आज आमदारकीची शपथ घेतली.
मुलुंडकरांच्या सर्वांगीण विकासासाठी या पदाचा प्रत्येक क्षण उपयोगी ठरवण्याचा माझा निर्धार आहे. मूलभूत सुविधा भक्कम करणे, आधुनिकतेला चालना देणे, प्रत्येक मुलुंडकरांचे जीवनमान उंचावणे हे माझे ध्येय आहे.
महायुती सरकार सामान्यांच्या हितासाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार आहे. मुलुंडच्या सक्षमीकरणासाठी माझे प्रयत्न अविरत सुरू राहतील.