भाजप स्थापना दिन – संघटन आणि संकल्पाचा उत्सव
भाजपच्या स्थापना दिनानिमित्त, आमचे नेते व महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. Devendra Fadnavis जी, यांनी थेट प्रक्षेपणाद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी १.५ कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि संघटनेच्या मजबुतीबाबत मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री Chandrashekhar Bawankule जी, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष श्री Ravindra Chavan जी, मुंबई अध्यक्ष श्री Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार जी यांनीही संघटनेच्या मजबुतीबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचा थेट प्रसारण माझ्या देवीदयाल स्थित कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. “मजबूत संघटन, मजबूत देश” या ध्येयाशी बांधिल राहून, या ऑनलाईन कार्यकर्ता संमेलनात अनेक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
संघटनेच्या बांधणीसाठी आणि लोकशाही सशक्त करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका महत्त्वाची आहे, हे या संवादातून अधोरेखित झाले.