भारतरत्न, माजी पंतप्रधान, श्रद्धेय स्व. अटल बिहारी वाजपेयीजी यांची आज जयंती. प्रचंड त्याग आणि तपस्येतून त्यांनी जनसेवेचा मंत्र दिला. जयंतीनिमित्त आज तो मंत्र जोपासत मुलुंडकरांचे आयुष्य अधिक सुखकर करण्याच्या दिशेने पाऊल उचलले. या क्रमात…
मुलुंड पूर्व येथील म्हाडा कॉलनीमधील आर.आर.सिंह शाळेच्या बाजूच्या खेळण्याच्या मैदानाचे लोकार्पण केले. मुलुंडकरांना मोकळा श्वास घेण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली.
गव्हाणपाडा सिग्नल येथील मच्छी मार्केटच्या वास्तूचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. मच्छिमार बांधवांच्या चेहऱ्यावरील स्मित प्रेरणादायी होते.
वाजपेयीजींच्या जयंतीदिनी या प्रकल्पांचे लोकार्पण केले, नागरिकांना सुविधा देण्याचा आनंद अनुभवता आला. मुलुंडच्या प्रगतीसाठी अशीच नवी पावले उचलत राहू!