भारतरत्न, माजी पंतप्रधान, श्रद्धेय स्व. अटल बिहारी वाजपेयीजी यांची आज जयंती. यानिमित्त मुलुंड पूर्व येथे वृक्षारोपणाचा पवित्र उपक्रम राबवला. वाजपेयीजींच्या दूरदर्शी विचारांप्रमाणे, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी एक पाऊल उचललं. वृक्षारोपण करून पृथ्वीला नवसंजीवनी देण्याचा हा संकल्प आहे, वाजपेयीजींना आदरांजली अर्पण करण्याचा सुंदर मार्ग ठरला. असं मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.