भाजप स्थापना दिवसानिमित्त ध्वजारोहण व कार्यकर्त्यांचा सत्कार कार्यक्रम
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त माझ्या कार्यालयात, तसेच मुलुंड मंडळ कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. त्यानंतर ईशान्य मुंबई जिल्हा कार्यालयात ध्वजारोहण व कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. आशिष शेलारजी, माजी खासदार श्री. मनोज कोटकजी, आमदार श्री. राम कदमजी, जिल्हाध्यक्ष श्री. दीपक दळवीजी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमातून पक्षप्रेम, एकता आणि राष्ट्रनिष्ठा यांचे पुनःस्मरण झाले. सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह आणि योगदान खरंच कौतुकास्पद आहे.