भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. वयाच्या ९७ व्या वर्षीही पक्षासाठी समर्पण आणि निष्ठेचा आदर्श निर्माण करणारे कार्यकर्ते भाजपकडे आहेत. यापैकीच एक असलेल्या ९७ वर्षीय लक्ष्मीदास ठक्कर यांना त्यांच्या घरी भेटण्याचा बहुमान मिळाला.
गेल्या ७७ वर्षांपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची पुन्हा एकदा पक्ष सदस्य म्हणून नोंदणी करताना मन अभिमानाने भरून आले. त्यांचा जीवनप्रवास आणि समर्पण आमच्यासाठी नेहमीच प्रेरणा राहील. असे निष्ठावंत कार्यकर्ते भाजपचा कणा आहेत.