मराठी राजभाषा उत्सव समारंभ आपल्या मुलुंडमध्ये पार पडतो आहे. सन्मित्र सेवा मंडळ, मुलुंड सार्वजनिक उत्सव समितीने यासाठी पुढाकार घेतला आहे. या सोहळ्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा!
शिवछत्रपतींनी पावन केलेली मराठी आपण बोलतो याचा आपणा सर्वांना गर्व आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीचा गौरव साजरा करण्यासाठी सर्वजण एकदिलाने सहभागी होवूयात.