मानखुर्द – शिवाजीनगर इथे आयोजित करण्यात आलेली प्रचारयात्रा अत्यंत जोरदारपणे आणि जल्लोषात पार पडली


आज मानखुर्द – शिवाजीनगर इथे आयोजित करण्यात आलेली प्रचारयात्रा अत्यंत जोरदारपणे आणि जल्लोषात पार पडली. या प्रचारयात्रेदरम्यान, आद्य क्रांतिकारक लहुजीराजे साळवे चौकात त्यांच्या प्रतिमेला आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर इथे आदरणीय अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला मला नमन करता आलं. या दोन्ही थोर व्यक्तिमत्त्वांपुढे नतमस्तक होताना मी त्यांचा जयजयकार देखील केला. याचबरोबर आदल्याच दिवशी पार पडलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित चौकातील काही कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देखील मी नमन करत त्यांचे आशिर्वाद घेतले. या प्रचारयात्रेला महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणि स्थानिकांचा तसेच महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला.

I participated enthusiastically in today’s grand rally organized from Mankhurd to Shivajinagar. During this rally, I paid homage to the revered statues of the revolutionary Lahujiraje Salve at Lahujee Salve Chowk and Lok Shahir Anna Bhau Sathe at Lok Shahir Anna Bhau Sathe Nagar. Standing humbly before these towering personalities, I also cheered in admiration. On the occasion of Dr. Babasaheb Ambedkar’s birth anniversary, I participated in some programs held at Chowk, paying my respects to Dr. Babasaheb Ambedkar as well. The enthusiasm of the Mahayuti activists and the participation of the locals, especially women, was notable in this rally.

Please follow and like us:
0 views
Posted on April 15, 2024

You may also like

Page 4 of 44