मी जन्माने आणि कर्माने मुंबईकर आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मराठमोळ्या संस्कृतीशी जन्मापासूनच एकरूप झालो. मराठी मातीशी नाळ जोडली असल्यानेच इथले सगळे सण मी जोरदार साजरे करतो. म्हणूनच ‘मराठी दांडिया’, ‘मराठमोळा दिपोत्सव’ या कार्यक्रमांना सगळ्या मुंबईकरांचा मोठा सहभाग असतो. तसेच जेव्हा ‘जय जय महाराष्ट्र माझा’ गाणं सुरू होतं; तेव्हा मी देखील ते गाणं जोषातच गातो.