मुंबईतील वाढते वायुप्रदूषण हे शहरातील आरोग्यासाठी गंभीर समस्या बनली आहे, विशेषतः बांधकामांमुळे होणाऱ्या २९ टक्के प्रदूषणाबद्दल विचार करणे आवश्यक आहे. मुंबई महानगरपालिका (BMC) अधिकारी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मुंबईचे वायुप्रदूषण जीवघेणे होण्याआधी आवश्यक त्या उपाययोजना राबविणे गरजेचे आहे, आणि यासाठी आम्ही विधिमंडळात ठोस मागणी केली होती.
विशेषतः मुलुंडसारख्या भागातील नागरिकांना स्वच्छ आणि निरोगी हवा मिळावी, यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत.