मुंबई महानगरपालिकेच्या टी विभाग क्षेत्रात अनेक प्रलंबित कामे आहेत. ही कामे मार्गी लावण्यासाठी आज महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत मनपा सहाय्यक आयुक्त अजय पाटणे जी , आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मुलुंडकरांच्या दैनंदिन जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या मुद्द्यांवर चर्चा झाली:
1. डी.पी. रोड राजा इंडस्ट्रियल इस्टेट ते एल.बी.एस. मार्ग रस्त्याचा आढावा.
2. डी.पी. रोड डी.डी.मु. रोड ते सरोजिनी नायडू रोड रस्त्याचा प्रश्न.
3. स्वप्न नगरी ते वैशाली नगर जोड रस्त्याचे काम.
4. यश अपार्टमेंट, मुलुंड पूर्व येथील अनधिकृत कंपाउंड वॉलवर आलेल्या नोटिसीचा आढावा.
5. गव्हाण पाडा सिव्हरेज आणि ड्रेनेजची समस्या.
6. स्थानीय वसाहतींमध्ये काम करणाऱ्या संस्थांबाबत प्रलंबित तक्रारी.
7. अमर नगर येथील दुकानांशी संबंधित अडचणी.
8. साई धाम – तुलीप रोडच्या स्ट्रीट लाइट व ड्रेनेज समस्यांबाबत चर्चा.
बैठकीतून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि प्रकल्पांना गती देण्यासाठी स्पष्ट धोरणे आखण्यात आली.