मुलुंडमध्ये रेल्वेचा आरक्षित भुखंड आहे. त्यावर मुलुंड टर्मिनल्स व्हावे, हे आमचे स्वप्न आहे. यासाठीचा पाठपुरावा मी सातत्याने करतो आहे. मुलुंडमध्ये मोठ्याप्रमाणात कोकणी बांधव राहतात. त्यांच्यासाठी मोठी सोय मुलुंड टर्मिनल्सच्या माध्यमातून होईल. आज विधानसभेत या संबंधीची वास्तविकता सादर केली. मुख्यमंत्र्यांकडून संयुक्य बैठक आयोजित व्हावी, तातडीने मुलुंड टर्मिनल्सचा विषय मार्गी लावावा, अशी विनंती केली.