मुलुंड कॉलनी, गणेश पाडा येथील रहिवाशांचे घरे वनविभागाच्या हद्दीत येत नसतानाही, वनविभागाकडून त्यांच्या घरांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत होती आणि नागरिकांना आश्वस्त केले जात होते. या पार्श्वभूमीवर संबंधित रहिवाशांनी माझ्या कार्यालयात येऊन आपली अडचण मांडली.
त्यांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत, मी तत्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सविस्तर चौकशी केली. चौकशीअंती झालेल्या संवादाच्या आधारावर हा विषय सकारात्मकरीत्या मार्गी लावण्यात आला.
हे देवाभाऊंचे सरकार आहे; एकही गोरगरीबाचे घर जाऊ देणार नाही.