मुलुंड पश्चिममधील बी.एम.सी स्टाफ कॉलनी व पूर्वेकडील पाम एकर्स, एन.एम. जोशी, मुकुंद, श्री साई शिल्पा, एकविरा दर्शन चाळ अशा विविध सोसायट्यांना भेट दिली. सर्वप्रथम एन.एम.जोशी सोसायटी मध्ये नवं मतदारांकडून स्वागत करण्यात आले. नवं भारताच्या निर्मितीचा महाकाय प्रकल्प पंतप्रधान मोदींनी हाती घेतला आहे. युवकांच्या सहभागामुळे याला गती मिळते आहे. भाजपने जगात तिरंगा उंचावला आहेत. महाराष्ट्रात अमुलाग्र बदल होत आहेत. यामुळे नवं मतदारांच्या मनात भाजपबदल आदराचे स्थान आहे. मुलुंडच्या नवं मतदारांनी मला मतदान करत नवं भारताच्या निर्माण प्रक्रियेला गती देण्याचा ठाम निर्णय घेतल्याचं सांगितलं.