मुलुंड येथील कालिदास तथास्थु हॉलमध्ये भारतीय जनता पार्टी – उत्तर पूर्व मुंबईच्या वतीने आयोजित राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त कार्यशाळेत उपस्थित राहिलो आणि उपस्थित कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधला.
या कार्यक्रमामध्ये अहिल्यादेवींच्या दूरदृष्टी, समाजसेवा, न्यायप्रियता आणि प्रजावत्सल प्रशासनाचे आजच्या काळातील संदर्भात महत्त्व अधोरेखित करण्यात आले. त्यांच्या कार्याचे स्मरण करताना आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन समाजनिर्मिती आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये योगदान देण्याचा निर्धार केला.
उपस्थित युवा कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक भान आणि सेवा भाव जागवण्यासाठी हे व्यासपीठ खूपच प्रेरणादायी ठरले.
अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन म्हणजे नारीशक्ती, नेतृत्व आणि समर्पण यांचे उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या आदर्शांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोचवणे ही आपली जबाबदारी आहे.




 
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
    