मुलुंड विधानसभेच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. सकाळी वीर संभाजी नगर येथील हनुमान मंदिरापासून अमर नगर परिसरापर्यंत आणि सायंकाळी देवी दयाल रोड कार्यालय ते मुरार रोड जंक्शनपर्यंत मोठ्या उत्साहात नागरिकांशी संवाद साधला. मुलुंडकरांचा प्रचंड सहभाग, आपला आशीर्वाद आणि पाठिंबा यामुळे विजयाची दिशा निश्चित झाली आहे. चला, आपल्या या एकजुटीने प्रगतीची नवी कहाणी लिहूया.