मुलुंडकरांच्या मुलभूत समस्या सोडवणे आणि त्यांचे जीवनमान अधिक सुखकर बनवणे हेच आमचे ध्येय आहे. विकासकामांना गती देत, आज आम्ही सहा प्रमुख ठिकाणी रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण कामांचा शुभारंभ केला.
1. सरदार प्रतापसिंह गार्डनपासून रेडवूड्स ते टीकवूड्सपर्यंत
2.फागुनमल मोटवानी गल्ली, जी.जी.एस रोड ते काळा पत्थर पर्यंत मुलुंड पश्चिम येथे रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण
3. योगी हिल्स, स्वप्न संगीत सोसायटीपासून ऑक्सकोल्ड सोसायटी, मॉडेल टाउन, स्वप्न नगरी रोडपासून नागरसेन नगर (बुद्ध विहार)पर्यंत
4.मॉडेल टाउन, स्वप्न नगरी रोड पासून ते नागरसेन नगर (बुद्ध विहार) पर्यंत मुलुंड पश्चिम येथे रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण
5. वीणा नगर रोड जंक्शनपासून एपेक्स हॉस्पिटलपर्यंत
6. बी.पी. क्रॉस रोड ३ ते ४, बाबा पदमसी जंक्शनपासून बी.पी. क्रॉस रोड नंबर ५पर्यंत
या ठिकाणी सुरू केलेल्या कामांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हे प्रकल्प मुलुंडच्या भविष्याचा पाया अधिक मजबूत करतील, हे पाहून मी स्वतःला आनंदी आणि कृतार्थ समजतो.