विक्रोळी विधानसभा मतदार संघात होम मिनिस्टर (खेळ वहिनिंचा) स्पर्धा दुर्गा देवी शर्मा गार्डन, चैतन्य नगर, आय. आय. मार्केट, पवई येथे २७ फेब्रुवारीला पार पडली. वार्ड १२२ मधील महिलांनी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्येक सहभागी महिला स्पर्धकांना साडी देऊन गौरवण्यात आले, तर लक्की ड्रॉमधून ३ महिलांना पैठणी देण्यात आली. दुचाकी, फ्रीज, वॉशिंग मशीन यांसारखी भरघोस बक्षिसे अंतिम फेरीत ठेवण्यात आली. खेळीमेळीच्या वातावरणात एकत्र येण्याची आणि आनंद साजरा करण्याची ही अनोखी संधी आहे