 विधान भवन,मुंबई
विधान भवन,मुंबई24 मार्च 2025
 मुंबईकरांसाठी पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न – नवीन धरणांची नितांत आवश्यकता!
मुंबईकरांसाठी पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न – नवीन धरणांची नितांत आवश्यकता!मुंबई शहराला वाढत्या लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा मिळावा, यासाठी गेल्या ३० वर्षांत एकही नवीन धरण प्रकल्प उभारलेला नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे.
महानगरपालिकेच्या हाइड्रॉलिक विभागाला रोज वेगवेगळ्या विभागांमध्ये पाण्याचा प्रेशर कमी करून डेफिसिट मेंटेन करावे लागत आहे. पण ही तात्पुरती व्यवस्था असून, पाणीटंचाईचा कायमस्वरूपी उपाय म्हणजे नवीन धरणांची तातडीने उभारणी.
मुंबईच्या भविष्यासाठी महानगरपालिकेने प्रथम प्राधान्य नवीन धरण प्रकल्पांना द्यावे, ही मागणी विधिमंडळात करण्यात आली. अन्यथा येत्या काही वर्षांत मुंबईला मोठ्या पाणी संकटाला सामोरे जावे लागेल.




 
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
     
                    
        
        
        
    