शबरी आदिवासी प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याचा सन्मान मिळाला. या सोहळ्यात माझ्यासोबत आमदार किरण लहमाटे जी, प्रतिष्ठानाचे अध्यक्ष विष्णू बुळे जी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. आदिवासी समाजातील विद्यार्थी मुख्य प्रवाहात येत आहेत आणि सोबत आपली भाषा व परंपरा टिकवत आहेत. हे आदिवासी समाजाकडून शिकण्यासारखे आहे. आपल्या प्रगतीसाठी एकत्र येत राहूया. मी कायम आदिवासी समाजासोबत आहे. जय बिरसा मुंडा, जय हिंद.