संयुक्त शिवजयंती व भीम जयंती सोहळा आणि नागरी सन्मान
सु.ल.गद्रे सभागृह, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड पश्चिम येथे सन्मित्र सेवा मंडळ व महाराष्ट्र सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त शिवजयंती व भीम जयंती सोहळा मोठ्या उत्साहात आणि गौरवशाली वातावरणात पार पडला. या सोहळ्याच्या निमित्ताने मा. रवींद्रजी प्रभुदेसाई यांना नुकत्याच प्राप्त झालेल्या डॉक्टरेट पदवीबद्दल नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. अशा प्रेरणादायी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग आला, याचा मनस्वी आनंद झाला.