सन्मान मुलुंडकरांचा…!
मुलुंडमधील प्रतिभावंत माताभगिनी व खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. मुलुंड मॅरेथॉन, होम मिनिस्टर (खेळ वहिनींचा) आणि फिट मुलुंड (बॅडमिंटन, कॅरम, फुटबॉल, चेस, टर्फ क्रिकेट) या स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आलं. राजीव गांधी ग्राउंड, नाहूर गाव येथे हा सोहळा पार पडला.
विजेत्यांना दुचाकी, फ्रिज, वाशिंग मशीन, ट्रॉफी, मेडल्स आणि सन्मानपत्र देऊन, त्यांचा गौरव करण्यात आला. मुलुंडकरांच्या खेळाडूवृत्तीला यातून चालना मिळाली. हा महोत्सव मुलुंडच्या क्रीडा संस्कृतीला नवा उंची देणारा ठरला. सर्व सहभागी स्पर्धकांचे मन:पूर्वक आभार!