होम मिनिस्टर (खेळ वहिनिंचा) स्पर्धा १ मार्चला पार पडली. विक्रोळी विधानसभा वार्ड क्र. ११७ मतदारसंघातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दोन दिवसात १००० पेक्षा अधिक महिलांनी खेळात भाग घेतला. महापौर मैदान, कांजूरमार्ग पूर्व येथे ही स्पर्धा पार पडली. प्रत्येक सहभागी महिला स्पर्धकांना साडी, लक्की ड्रॉमधून ३ महिलांना पैठणी देण्यात आली. दुचाकी, फ्रीज, वॉशिंग मशीन यांसारखी भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
आज २ मार्च, विक्रोळी विधानसभेतील महिलांची खेळाची अंतिम फेरी महापौर मैदान, कांजूरमार्ग पूर्व येथे सायंकाळी ७ ला पार पडणार आहे.