होम मिनिस्टर (खेळ वहिनिंचा) या खेळाने मुलुंड पश्चिमेकडील लायन्स क्लब ग्राउंड येथे रंगत आणली. प्रत्येक सहभागी महिला स्पर्धकांना साडी देऊन सन्मानित करण्यात आलं. लकी ड्रॉमध्ये ३ भाग्यवान महिलांना पैठणी साडीची भेट मिळाली.
अंतिम फेरीसाठी दुचाकी, फ्रिज, वॉशिंग मशीनसारखी दमदार बक्षिसं सज्ज आहेत.
महिला भगिनींनी मुलुंड महोत्सवाचा पुरेपूर आनंद घ्यावा. आरोग्यदायी व आनंदी मुलुंडसाठी असेच एकत्र यावे.