होम मिनिस्टर (खेळ वहिनिंचा) स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे


होम मिनिस्टर (खेळ वहिनिंचा) स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. दैनंदिन कामातून वेळ काढत आपल्यातील गुणांना महिला भगिनी वाव देत आहेत. २५ जानेवरीला मुलुंड पूर्व, नानेपाडा येथे हा कार्यक्रम पार पडला.
प्रत्येक सहभागी स्पर्धक महिलांना साडी भेट देण्यात आली. लक्की ड्रॉमधून ३ महिलांना पैठणी देण्यात आली. अंतिम फेरीत दुचाकी, फ्रीज, वॉशिंग मशीन यांसारखी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. खेळीमेळीच्या वातावरणात मुलुंडकर महिलांना एकत्र येण्याची ही अनोखी संधी आहे.
Please follow and like us:
100 views
Posted on January 27, 2025

You may also like

Page 2 of 54