होम मिनिस्टर (खेळ वहिनिंचा) स्पर्धा १३ फेब्रुवारीला पार पडली


होम मिनिस्टर (खेळ वहिनिंचा) स्पर्धा १३ फेब्रुवारीला पार पडली. भांडुप विधानसभा वार्ड क्र. ११५/११६ मतदारसंघातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्काइलाइन, ९० फ़ीट रोड, महाराष्ट्र नगर येथे ही स्पर्धा पार पडली. महाराष्ट्र नगर येथे १२/१३ फेब्रुवारी अशा दोन दिवसात १००० पेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला. प्रत्येक सहभागी महिला स्पर्धकांना साडी, लक्की ड्रॉमधून ३ महिलांना पैठणी देण्यात आली. दुचाकी, फ्रीज, वॉशिंग मशीन यांसारखी भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली. खेळीमेळीच्या वातावरणात एकत्र येण्याची आणि आनंद साजरा करण्याची ही अनोखी संधी आहे.

Please follow and like us:
0 views
Posted on February 13, 2025

You may also like

Page 5 of 46