भायखळा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांची वापरात असलेली इमारत मोडकळीस आल्याने या जागेचे आरक्षण तत्कालीन (महाविकास आघाडी) सरकारने बदलून या जागेवर उर्दू सेंटर बांधण्याचे काम सुरू केले, याबाबत आक्षेप घेत शासनाने या जागेवर युवकां करीता प्रशिक्षण केंद्र सुरू करावे ही मागणी आमदार मिहीर कोटेचा यांनी आज दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात केली.