आज दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी नागपुर येथे हिवाळी अधिवेशनात सत्तापक्षा तर्फे 293 अन्वये उपस्थित चर्चेत भाग घेताना भाग घेऊन मुंबईतील महत्वाच्या विषयांवर अनेक मुद्दे उपस्थित केले.
जुन्या व धोकादायक झालेल्या इमारतीतील नागरीकांना हक्काचे घर मिळावे अशी मागणी केली.
मुंबई महापालिकेत एकाच पदावर अनेक वर्ष कार्यरत असलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची बदली व चौकशी करावी तसेच तरुण पिढीत वाढलेली अमली पदार्थ सेवनाचे वाढलेले प्रमाण पाहता यावर सरकारने कार्यवाही करावी
मुंबईत हवा प्रदूषण वाढत असून मुलुंड विभागात आरएमसी प्लांट मुळे नागरीकांना खूपच त्रास होत आहे याबाबत कार्यवाही करावी
मुंबई महानगपालिकेतील 1980च्या पूर्वीचे जन्म दाखल्यांचे तातडीने डिजिटल रूपांतरण करुन नागरीकांना चांगली सेवा द्यावी
मुलुंड पुर्व येथील एका विकासकांनी महापालिका अधिकारी वर्गास हाताशी धरून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे त्यावर कार्यवाही करावी
मुंबईतील आद्य नागरिक आगरी कोळी रहिवाशी यांच्या गावठनातील घरांचे नियमितीकरण करुन त्यांना सरकारने संरक्षण देणे
G 20 या आंतररष्ट्रीय परिषदे निमित्त मुंबईला अतंत्य जलद गतीने सुशोभित केल्याबद्दल महापालिका आयुक्त आणि अधिकारी वर्गाचे अभिनंदन