अखिल विश्व गायत्री परिवाराच्या वतीने मुलुंड पश्चिम, रिचर्डसन एंड क्रुडास ग्राउंड येथे आयोजित केलेल्या ‘विराट दीप महायज्ञ’ आणि ‘ज्योती कलश पूजन’ सोहळ्याचा अनुभव एक अत्यंत भावपूर्ण आणि आध्यात्मिक होता
अखिल विश्व गायत्री परिवाराच्या वतीने मुलुंड पश्चिम, रिचर्डसन एंड क्रुडास ग्राउंड येथे आयोजित केलेल्या ‘विराट दीप महायज्ञ’ आणि ‘ज्योती कलश पूजन’ सोहळ्याचा अनुभव एक अत्यंत भावपूर्ण आणि आध्यात्मिक होता. गायत्री देवीला भक्तिभावाने नमन करणे आणि त्यानंतर मनोभावे पूजन करणे हे एक अत्यंत समर्पणाचे क्षण होते. यावेळी उपस्थित भक्तगण आणि नागरिकांनी एकत्रितपणे आरती केली आणि वातावरण प्रचंड भक्तिमय झाले.
आदरणीय डॉक्टर चिन्मय पंड्या जी यांची वाणी प्रभावशाली आणि विचारशक्तीला चालना देणारी होती.
या सोहळ्यात सहभागी होण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले, याबद्दल मी अत्यंत आनंदीत आणि समाधानित आहे. अशा प्रकारच्या सोहळ्यांनी समाजातील आध्यात्मिक वातावरण आणखी समृद्ध होईल आणि लोकांच्या जीवनात शांती आणि सद्गुणांची वाढ होईल.
सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री श्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे जी, माजी वित्त व वन मंत्री श्री Sudhir Mungantiwar जी उपस्थित होते.































