आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलनामाचा अखंड गजर करण्याचा आनंद लाभला
मी मुलुंडकर प्रतिष्ठानच्या वतीने मुलुंड पूर्व येथे आषाढी एकादशीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य सेवा वारीमध्ये सहभागी होत वारकरी बांधवांसमवेत विठ्ठलनामाचा अखंड गजर करण्याचा आनंद लाभला. “ज्ञानोबा-तुकाराम” यांच्या जयघोषाने, विठ्ठलनामाच्या अखंड गजराने आणि वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय वातावरणाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
यावेळी नगरसेविका सौ. दिपिका संदेश घाग, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
॥ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ॥

















