ईस्टर्न एक्सप्रेस हायवे ते टाटा कॉलनी रोडला जोडणाऱ्या नव्या जोडरस्त्याचे भूमिपूजन
ईस्टर्न एक्सप्रेस हायवे ते टाटा कॉलनी रोडला जोडणाऱ्या नव्या जोडरस्त्याचे भूमिपूजन 23 नोव्हेंबर 2025 रोजी माझ्या हस्ते करण्यात आले होते. त्या दिवशी हा रस्ता एका महिन्याच्या आत पूर्ण केला जाईल, असे मी जनतेला दिलेले आश्वासन आज प्रत्यक्ष पाहणीदरम्यान पूर्ण होताना पाहून मनापासून आनंद झाला.
महानगरपालिकेने हा रस्ता आजपासून वाहतुकीसाठी खुला केला असून, यामुळे मुलुंड पूर्वेकडील वाहतूक कोंडीला मोठा दिलासा मिळणार आहे.







