Home Events कालिदास क्रीडा संकुल येथे विशेष बैठकीत सहभागी

कालिदास क्रीडा संकुल येथे विशेष बैठकीत सहभागी

Date

May 16 2026
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

मुलुंड पश्चिमेकडील कालिदास क्रीडा संकुल येथे आज ज्येष्ठ नेते किरीट सोमैया जी आणि मुंबईच्या महापौर सौ. रितुताई तावडे यांच्या उपस्थितीत आयोजित विशेष बैठकीत सहभागी होत संकुलातील विविध प्रशासकीय आणि आर्थिक बाबींचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी क्रीडा संकुलातील कथित आर्थिक गैरव्यवहार, टेंडर प्रक्रियेत झालेल्या अनियमितता, सार्वजनिक सुविधांचा चुकीचा वापर तसेच कामांच्या गुणवत्तेबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांवर गंभीर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या पैशातून उभारण्यात आलेल्या या महत्त्वाच्या क्रीडा संकुलाचा कारभार पारदर्शक आणि जबाबदारीने चालावा, यासाठी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.

या प्रसंगी माजी खासदार श्री. मनोज कोटक, नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे, नगरसेविका सौ. दिपिका संदेश घाग, नगरसेविका डॉ. हेतल गाला मोरवेकर, पदाधिकारी तसेच संबंधित महापालिका अधिकारी उपस्थित होते.

Please follow and like us: