गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून रुग्णांच्या सेवेसाठी व्हीलचेअर्स उपलब्ध करून देण्यात आले
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आज मुलुंड पश्चिमेकडील एम.टी. अगरवाल हॉस्पिटल येथे मुलुंड कॉलनी मंडळ सचिव श्री. अनिकेत येरुनकर तसेच भारतीय जनता युवा मोर्चा ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष श्री. योगेश मकवाना यांच्या पुढाकारातून रुग्णांच्या सेवेसाठी व्हीलचेअर्स उपलब्ध करून देण्यात आले. या सेवाभावी उपक्रमास उपस्थित राहून त्यांच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक केले.
गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी सेवा, संवेदना आणि समाजहिताचा संदेश देणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असून रुग्णसेवेत मोलाची भर घालणारा आहे.






















