Home Events छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून राबविण्यात येत असलेल्या “महाराजस्व समाधान शिबिर अभियान” कार्यक्रमास उपस्थित राहिलो.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून राबविण्यात येत असलेल्या “महाराजस्व समाधान शिबिर अभियान” कार्यक्रमास उपस्थित राहिलो.

Date

Mar 07 2026
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

मुलुंड पूर्व, रावसाहेब बाळाराम ठाकूर विद्यालय येथे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत, तहसीलदार कार्यालय कुर्ला अंतर्गत मंडळनिहाय आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून राबविण्यात येत असलेल्या “महाराजस्व समाधान शिबिर अभियान” कार्यक्रमास उपस्थित राहिलो.

या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित विविध शासकीय दाखले, अर्ज व आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करून अनेक प्रलंबित प्रश्न त्वरित सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शासनाच्या सेवा अधिक सुलभ आणि प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

तसेच या प्रसंगी माझ्यासह नगरसेवक श्री प्रकाश गंगाधरे, नगरसेविका सौ. दिपिका संदेश घाग, नगरसेविका डॉ. हेतल गाला मोरवेकर, शासनाचे अधिकारी वर्ग, इतर पदाधिकारी, आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Please follow and like us: