छत्रपती संभाजीराजे सांस्कृतिक भवन, मुलुंड पूर्व येथे मुलुंड पूर्व मंडळ द्वारा आयोजित मोदी@11 संकल्प सभा पार पडली
छत्रपती संभाजीराजे सांस्कृतिक भवन, मुलुंड पूर्व येथे मुलुंड पूर्व मंडळ द्वारा आयोजित मोदी@11 संकल्प सभा पार पडली.
देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या 11 वर्षांच्या यशस्वी, दूरदर्शी, आणि राष्ट्रहितकारी कार्यकाळाच्या गौरवप्रित्यर्थ आयोजित या कार्यक्रमात मला मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
या 11 वर्षांत भारताने फक्त प्रगतीच केली नाही, तर आत्मनिर्भरतेच्या दिशेने ऐतिहासिक झेप घेतली.
जनधन योजना, आयुष्मान भारत, डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत अभियान, आत्मनिर्भर भारत अशा अनेक योजनांनी सामान्य नागरिकांचे जीवन बदलले आहे.
या सभेतून आपण पुन्हा एकदा निर्धार केला – सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी कार्य करतच राहणार!
मुलुंड पूर्वमधील तमाम कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक यांचे मनःपूर्वक आभार, ज्यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम अधिक तेजस्वी झाला.































