Home Events झोपडपट्टी समस्या निराकरण शिबीर

झोपडपट्टी समस्या निराकरण शिबीर

Date

Jun 18 2026
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुलुंड विधानसभा क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसन बाधित नागरिकांच्या विविध प्रलंबित समस्या व अडचणींचे निराकरण करण्याच्या उद्देशाने मुलुंड पश्चिमेकडील दयानंद बँक्वेट हॉल येथे विशेष समस्या निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरामध्ये बायोमेट्रिक प्रक्रिया, प्रलंबित भाडे, पात्रता विषयक अडचणी, सदनिका वाटप, वारस प्रमाणपत्र, परिशिष्ट २ मधील समावेश तसेच झोपडपट्टी पुनर्वसनाशी संबंधित इतर महत्त्वाच्या विषयांवर नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संबंधित यंत्रणांमार्फत नागरिकांच्या समस्यांवर आवश्यक कार्यवाही करण्यात आली. या शिबिराच्या माध्यमातून अनेक नागरिकांना वारस प्रमाणपत्रांचे प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी नगरसेविका सौ. दिपिका संदेश घाग, नगरसेविका डॉ. हेतल गाला मोरवेकर, माजी नगरसेवक श्री. नंदकुमार वैती, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, संबंधित अधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Please follow and like us: