ट्रॅफिक आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक
ट्रॅफिक आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक
आज माझ्या कार्यालयात महानगरपालिका अधिकारी आणि ट्रॅफिक विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
या बैठकीत खालील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली:
मुलुंड कॉलनीतून जाणारे माती व डेब्रिसने भरलेले ओव्हरलोडेड डंपर — यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांची वाढती शक्यता
GMLR रोड येथील निर्माण होणारी ट्रॅफिकची समस्या
मुलुंड परिसरातील इतर नागरी समस्या आणि स्थानिक नागरिकांच्या तक्रारी
संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.
वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी नियमबद्ध कारवाई केली जाईल.
मुलुंडकरांच्या सुरक्षिततेसाठी आणि जीवनमान सुधारण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध आहे.
















