ड्रेनेज लाईनमधील सांडपाणी चाळीतील परिसर व नागरिकांच्या घरांमध्ये जमा झाल्याचे निदर्शनास आले
मुलुंड पश्चिम येथील गुरु बक्ष चाळ, बी.आर.रोड, अभिनव मित्र मंडळ परिसरातील स्थानिक महिलांनी कार्यालयात भेट देऊन ड्रेनेज लाईनमधील सांडपाण्यामुळे होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. त्याची तात्काळ दखल घेत स्थानिक नगरसेविका डॉ. हेतल गाला मोरवेकर व संबंधित महापालिका अधिकाऱ्यांसोबत लगेचच प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली.
पाहणीदरम्यान ड्रेनेज लाईनमधील सांडपाणी चाळीतील परिसर व नागरिकांच्या घरांमध्ये जमा झाल्याचे निदर्शनास आले. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.
नागरिकांना दिलासा मिळेपर्यंत या कामाचा सातत्याने पाठपुरावा करून ही समस्या मार्गी लावण्यात आली. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध.














































