Home Events नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद | मुलुंड पुर्व – एकवीरा दर्शन चाळ परिसर भेट

नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद | मुलुंड पुर्व – एकवीरा दर्शन चाळ परिसर भेट

Date

May 30 2025
Expired!

Time

8:00 am - 6:00 pm

नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद | मुलुंड पुर्व – एकवीरा दर्शन चाळ परिसर भेट

मुलुंड पश्चिमेतील एकवीरा दर्शन चाळ येथील स्थानिक नागरिकांनी परिसरातील समस्या माझ्या कार्यालयास कळविल्या. त्यानंतर महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली.

मुख्य समस्या पुढीलप्रमाणे होत्या:

* चाळीच्या बाजूने गेलेल्या नाल्याची अपुरी सफाई

* मोडकळीस आलेली भिंत – सापांचा वावर वाढण्याचा धोका

* महापालिकेच्या शौचालयाचे बांधकामानंतर डेब्रिज न हटविल्यामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता

यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील.

जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर

Please follow and like us: